संस्थेचे राबवलेले उपक्रम
अन्नदान
कपडे वाटप
चिवरदान
आमचा विषयी
बहुजन ट्रस्ट हि एक सामाजिक संस्था आहे.आमचा मूळ उद्देश समाजसेवा, महिलांचे सशक्तीकरण, शिक्षण, आरोग्य, कला, युवा मार्गदर्शन,आणि सार्वजनिक हित यांसारख्या विविध क्षेत्रांतील कार्य करण्यासाठी आहेत.ट्रस्टचा मुख्य ध्येय म्हणजे विविध सामाजिक, धार्मिक व आर्थिक स्तरांतील लोकांमध्ये समता, ऐक्य व बंधुभाव वाढवणे. एकमेकांच्या मदतीने समाज घडावा व सकारात्मक विचारांची चळवळ निर्माण व्हावी यासाठी काम करणे हा असुन संस्थे मध्ये महिलांना विविध क्षेत्रांमध्ये सक्षम बनवण्यासाठी ट्रस्ट शिवणकाम, संगणक प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, उद्योग प्रशिक्षण इ. उपक्रम राबविने याशिवाय महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती, आर्थिक मदत व स्वयंपूर्णतेकडे वाटचाल यासाठी मार्गदर्शन करते त्याच प्रमाणे ट्रस्ट गरीब, अनाथ व मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, फी, युनिफॉर्म, शिष्यवृत्ती व शैक्षणिक मार्गदर्शनाद्वारे मदत करते. तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे उपक्रमही घेते आणि आरोग्यदृष्टीने मागास भागांमध्ये आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी, दंततपासणी, रक्तदान शिबिर व जनजागृती मोहिमा राबवून सामान्य लोकांना मोफत उपचार व आरोग्यविषयक माहिती देते तसेच स्थानीय कलाकार, विद्यार्थी व युवक यांना आपली कला सादर करता यावी यासाठी चित्रकला, नृत्य, गायन, नाट्य व विविध खेळांच्या स्पर्धा व कार्यशाळा घेतल्या जातात. यामुळे कला व क्रीडेला प्रोत्साहन मिळते आणि बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ट्रस्ट व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरे, लघुउद्योग प्रशिक्षण, कर्ज सहाय्य व शासकीय योजना समजावून देणारे कार्यक्रम आयोजित करते त्याच प्रमाणे सार्वजनिक वाचनालयाद्वारे समाजात ज्ञानवाढ होण्यासाठी पुस्तके व अभ्यास सुविधा पुरविते. नैसर्गिक आपत्ती (पुर, वादळ, आगी) मध्ये मदतीसाठी अन्न, वस्त्र, निवारा पुरवण्यात येतो. तसेच शासनाच्या योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचे काम संस्था करते. एकंदरीत ही संस्था समाजातील गरजू, उपेक्षित व मागास घटकांसाठी कार्य करत असून, महिलांचे सशक्तीकरण, युवा विकास, शिक्षण, आरोग्य, कला व सामाजिक ऐक्य वाढवणे हे तिचे केंद्रबिंदू आहेत.

अनिल गुणाजी कांबळे
(संस्थापक अध्यक्ष:- बहुजन ट्रस्ट,महाराष्ट्रा राज्य )
